कवठा बु. शाळेत स्वागत-सत्कार व निरोप समारंभ
कवठा : अकोट पं.स.अंतर्गत येणाऱ्या कवठा बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी स्वागत-सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम भरवण्यात आला. नव्याने रुजू झालेले तसेच बदलीने या शाळेवरून जाणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेसाठी अनेक वर्षे अविरत सेवा देणाऱ्या आदर्श शिक्षक चंद्रशेखर महाजन, सहाय्यक शिक्षिका स्मिता तुरखडे, सहाय्यक शिक्षिका हर्षा ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांना निरोप देण्यात आला.त्याचप्रमाणे नव्याने रुजू झालेले शिक्षक चंद्रशेखर काळणे, मंजुषा चव्हाण, कल्पना काळणे, भावना कुकडे यांचा आदरपूर्वक स्वागत करण्यात आला.शिक्षकांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांविषयीच्या भावना प्रकट केल्या. मान्यवरांनीही शाळेच्या विकासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. निरोप देण्यात आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तूंचा वितरणही केला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन तायडे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच देवानंद रावणकार, पत्रकार राजेश साविकर, विजय रावणकार, गजानन सांगळे, प्रमोद धांडे, महिला उपसरपंच अलकाताई धांडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रियंका सपकाळ, सदस्य रेहाना शहा, शितल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.यशस्वी करण्यासाठी सागर रावणकार, भावना कुकडे, कल्पना काळणे, मंजुषा चव्हाण आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन चंद्रशेखर काळणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक धनराज कंकाळ यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/marathwadyacha-gaurav-lahan-bhoyachaya-shabdant/
