भाषण गाजलं व्हिडीओवर
जालना, १७ सप्टेंबर: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील रेवलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या भोऱ्या उर्फ कार्तिक वजीर यांनी दिलेलं भाषण जोरदार गाजलं आहे. मराठवाड्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल बोलताना भोऱ्याने आपल्या शब्दांनी शिक्षक, वर्गमित्र आणि गावकऱ्यांची मनं जिंकली.
भाषणादरम्यान मुंबईतील मित्राने विचारले, “भोऱ्या, असं काय आहे तुझ्या मराठवाड्यात?” यावर भोऱ्याने उत्तर दिलं:
“दुष्काळाच्या झळा, माणुसकीचा लळा, आपुलकीचा जिव्हाळा. दगडाच्या खाणी, प्रसिद्ध अजिंठा वेरूळची लेणी. नऊवारी पैठणी आणि नाथसागराचं निर्मळ पाणी. आद्य कवी मुकुंदराजाचं कुळ, छत्रपती शिवरायांचं मूळ, संत नामदेव-एकनाथांची वाणी, तीर्थयात्रेच्या स्थानी, तीन ज्योतिर्लिंगांना गोदापाठीचं पाणी.”
याशिवाय भोऱ्याने आपल्या भाषणात थोडे मिश्किल शब्दात राजकारणावरही भाष्य केले:
“शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी येथे सगळेच चोर. निजामानी लुटलं, राजकारण्यांनी ओरबडलं.”
भाषणाचा व्हिडीओ आता समोर आलाय आणि यामुळे भोऱ्याचं कौतुक जोरदार होत आहे. शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्याच्या धाडसाने आणि माणुसकीच्या भावनेने दिलेल्या संदेशाचे स्वागत केले.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जेव्हा मराठवाडा रझाकारच्या ताब्यातून मुक्त झाला होता. लहान भोऱ्याने या ऐतिहासिक दिवसाला आपल्या भाषणातून अधिक अर्थपूर्ण बनवलं आहे.
read also : https://ajinkyabharat.com/actress-emotional-post-share-kelly/
