रिसोड – तालुक्यात सर्वच गावामध्ये अनेक वर्षापासुन नागरीक शासकीय जागेवर परीवारासोबत दगड विटा साधे बांधकाम करुन राहण्यासाठी सहारा म्हणून अनेक वषांपासुन वास्तव्य करीत आहे.त्या जागा नावावर नसल्याच्या कारणाने त्यांना अनेक योजना पासुन वंचीत राहावे लागत ‘आहे. शासनाने असे सर्व अतिक्रमण धारकांना त्यांचा वास्तव्य करणारे जागेचा प्रस्ताव तयार करुन रितसर त्या जागा त्यांच व्यक्तीच्या नावाने करुन देण्याचे आदेश दिले आहे. परंत पंचायत समिती माफंत या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही व कुठलाच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती वर ढकलते तर पंचायत समिती ग्रामपंचायतला प्रस्ताव देतनाही असे सांगत दोन्हीची मानसिकता काम करण्याची दिसत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण धारक लाभापासुन वंचीत राहत आहे. या विषयावर गांभियाने लक्ष देऊन सर्व ग्रामपंचायतला प्रस्ताव बोलावून तात्काळ सर्व अतिक्रमण धारकांना त्यांचे राहते घराची जागा नियमाकुल करुन त्यांना नमुना आठ देण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या प्रशासनाच्या विरोधात तीत्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईंल. असा इशारा देण्यात आला आहे .
read also : https://ajinkyabharat.com/india-america-trade-constance-sudha-discussion/
