महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी; सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार-पाच वर्षांपासून लांबणीवर आहेत. या निवडणुकांसाठी मुदतवाढीची मागणी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. मंगळवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की 31 जानेवारीनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे तारखेचे वास्तव पुढील वर्षी निश्चित झाले आहे.
निवडणुका रखडण्याची कारणे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणांच्या मुद्यासह इतर अनेक कारणांमुळे उशीर झाला होता. निवडणूक आयोगाने न्यायालयाला निवडणूक घेण्यासंबंधी तयारीसाठी ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. आयोगाने प्रभाग पुनर्चना, आरक्षण निश्चिती, मतदारयादी तयार करणे यासारखी कामे सुरु केली होती, पण ईव्हीएमची उपलब्धता, सण-उत्सवाचे दिवस, कर्मचाऱ्यांची कमतरता यासारखी कारणं राज्याकडून नोंदवण्यात आली.
पुढील प्रक्रिया
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतवाढीनुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश आयोगाला दिले आहेत. यामध्ये प्रभाग पुनर्चना, आरक्षण, मतदारयादीची अंतिम तयारी, आणि ईव्हीएमसह सर्व तांत्रिक तयारी करणे अपेक्षित आहे.यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असल्याचे निश्चित झाले असून, राज्यातील राजकीय पक्षांसाठी ही तयारी सुरू झाली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ai/
