नगरपालिकेच्या शाळेत अंशकालीन निदेशकाचा अपमान;
कारंजा (लाड) : नगर परिषदेच्या मुलजीजेठा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक आसिम खान मुनीर खान यांनी शासनाचे आदेश पायदळी तुडवत अंशकालीन निदेशक जमील शेकुवाले यांना डावलून अतिथी निदेशकाची नेमणूक केली. या अन्यायाविरोधात शेकुवाले यांनी थेट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकायुक्त महाराष्ट्र आणि नगरपरिषदेच्या उच्चाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने यांनी सांगितले की, अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सर्व अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत आणि शासनाच्या ५ जून २०२५ च्या आदेशानुसार नियुक्त्या करताना पात्रता, नियम व निकषांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
मुख्याधिकारी नगरपरिषद कारंजा महेश वाघमोडे यांनी स्पष्ट केले की, शासनाचे आदेश उल्लंघन करून नियुक्ती झाल्यास संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. नगरपालिकेच्या शाळा असल्यामुळे कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असून, चुकीची नियुक्ती आणि शासन निर्णयाची अवहेलना झाल्याने औपचारिक कारवाईसाठी पत्र पाठवले जाणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/gharatch-nonancha-dongar/