वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर कारवाई!

ठाणे – ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, अवजड वाहने आता रात्री 12 नंतरच घोडबंदर रोडवर प्रवेश करतील.
यामुळे दिवसभरातील भयंकर वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वाचा निर्णय आणि कारवाईचे निर्देश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासोबत समन्वय साधून त्वरित निर्णय घेतला.

  • जेएनपीटीकडून येणारी वाहने आणि मीरा भायंदर, पालघरमार्गातून येणारी जड वाहने रात्री १२ नंतरच घोडबंदर रोडवर सोडण्याचे आदेश देण्यात आले.

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी सूचना दिली आहे.

 विशेष सूचना –ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना सर्व यंत्रणांचा समन्वय करून कठोर नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले.जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी येथे पार्किंगची व्यवस्था करण्याचेही आदेश दिले गेले.

काम पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार

घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही विशेष वाहतूक व्यवस्था लागू राहणार असून यंत्रणांना वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाढीव मनुष्यबळ आवश्यक असल्यास तेही नियोजन करावे, असे आदेश दिले गेले आहेत.

घोडबंदरवासियांचा रास्तारोको आंदोलन

वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांनी बोरवली ते ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

  • “रस्त्यावरती पडलेला खड्ड्यांपासून मुक्तता द्या!”

  • “ठाणे महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी”
    अशा नाऱ्यांनी आंदोलन भरले गेले.

वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मोठ्या प्रमाणात स्वागतार्ह ठरला असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.