Sholay Movie box office collection and budget : बॉलिवूडमधील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये ‘शोले’ या चित्रपटाचे नाव चर्चेत असते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 वर्षे पूर्ण उलटले आहेत. दरम्यान, आता निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. ‘शोले’ हा एक ब्रँडच बनला आहे, ज्यातील गाणी, संवाद आणि कथा प्रेक्षकांना विशेष भावली. विशेषतः अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची ‘जय-वीरू’ ही जोडी आजही लोकांच्या मनात घर करून आहे.बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केले होते की, ‘शोले’ हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. यावेळी अशा काही खास सीन सिनेमात समाविष्ट देखील करण्यात येणार होते, जे पूर्वी सेन्सॉर बोर्डाने (CBFC) काढून टाकले होते. या चित्रपटाने किती कमाई केली होती आणि पुन्हा प्रदर्शित होण्याआधी ओटीटीवर कुठे पाहता येईल, हे जाणून घेऊया.
चित्रपट ‘शोले’ची बॉक्स ऑफिस कमाई
1975 साली 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘शोले’चे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते, तर त्यांचे वडील जी. पी. सिप्पी यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, संजीव कुमार, हेमा मालिनी आणि असरानी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे पटकथा आणि संवाद सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिले होते.
Sacnilk या संकेतस्थळानुसार, ‘शोले’चा एकूण बजेट 3 कोटी रुपये इतका होता, तर त्याने जगभरात 50 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला होता. याआधीही 2004, 2014 आणि 2024 साली हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
‘शोले’ ओटीटीवर कुठे पाहता येईल?
‘शोले’मधील गाणी जसे की ‘ये दोस्ती’, ‘महबूबा-महबूबा’, ‘कोई हसीना’, ‘होली के दिन’ आणि ‘हां जब तक है जान’ आजही लोकांच्या ओठांवर आहेत आणि अजूनही त्यांचा आनंद घेतला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 5 वर्षे सलग थिएटरमध्ये चालू होता. हा विक्रम नंतर 20 वर्षांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने मोडला. जर तुम्हाला ‘शोले’ ओटीटीवर पाहायचा असेल, तर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सबस्क्रिप्शनसह तो पाहता येईल.
read also : https://ajinkyabharat.com/icc-kade-takra-pcb/