मातृत्व हरवलेल्या बाळाला हवाय मदतीचा हात

मातृत्व

वाशिम : येथील स्त्री रुग्णालयात श्वेता पडघान (वय २४) या महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेला प्रसूती झाल्यानंतर एक गोंडस बाळ जन्माला आले. हिरावलेल्या मातृत्वाची उणीव भरून काढण्यासाठी त्या चिमुकल्याला शांत निद्रा यावी याकरिता छोटीशी भेट म्हणून एक पाळणा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी चे संस्थापक सुगतजी वाघमारे यांचे मार्गदर्शनात भेट म्हणून देण्यात आला.यवतमाळ जिल्ह्यातील श्वेता पडघान या महिलेची दुसऱ्यांदा प्रसूती होती. प्रसूती दरम्यान एक गोंडस बाळ जन्माला आले.. परंतु दुर्दैवाने त्या बाळाचे मातृत्व जन्मतःच हिरावल्या गेले. चिमुकल्या बाळावर आणि त्या कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगाने समाजमन हेलावून गेले . चिमुकल्या बाळाला चंद्रमोळी झोपडीत सुखाची झोप लागावी यासाठी अकोला येथील तीक्ष्णगत वेल्फेअर सोसायटी यांचे वाशिम येथील शाखेचे जिल्हा समन्वयक धनंजय कपाले, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते तथा मातंग समाजाचे नेते जगदीश भाई इंगळे, दलीत आदिवासी समाजाच्या नेत्या सीताबाई धंदरे यांचे उपस्थितीत एक पाळणा छोटीशी भेट म्हणून देण्यात आला. यावेळी पडघान कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
जन्मतःच मातृत्व हरवलेल्या बाळाला हवाय मदतीचा हात !
स्वर्गवासी श्वेता पडघान या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्यामुळे जन्मलेल्या बाळाचे मातृत्व हिरावल्या गेले. या बाळाच्या संगोपनासाठी दर महिन्याला अंदाजे आठ ते दहा हजार रुपये एवढा खर्च उचलावा लागत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. मृत श्वेता हिचे पती रंगरंगोटीचे काम करतात. परंतु लहान बाळाला दिवसभर सांभाळण्यासाठी सध्या त्यांना मजुरीसाठी कामावर जाता येत नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने देणगी करावी. असे आवाहन मातंग समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

read also :https://ajinkyabharat.com/quick-teacher-danyachi-magani/