ओबीसी मधील विविध समाजाचे नेते आणि माजी आमदारांची विशेष उपस्थिती

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाचा आमरण उपोषण

महापुरुषांच्या फोटोला हार घालून ओबीसी आरक्षण वाचवीण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 प्रतिनिधिचे आमरण उपोषण सुरु

अकोला- राज्यात सक्षम असलेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार मराठा समाज मागास नाही. त्यामुळे त्या समाजाला आरक्षण देणे योग्य नाही. आणि राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गेझिटियर लागू करून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे आणि हा प्रकार ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. याला रोकथाम करण्यासाठी लोकशाही मार्गाने उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने आज सोमवार 15 सप्टेंबरपासुन जनार्दन हिरळकर, शंकर बापूरावं पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे, ऍड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर या पाच प्रतिनिधिनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या उपोषण मंडपात देशातील महापुरुष छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालून आमरण उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, व विविध समाजाचे नेते ज्यामध्ये अनिल शिंदे, गजानन वाघमारे, प्रा. डॉ. संतोष हुशे, अतुल नवात्रे सह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.ओबीसी समाजाला धैर्य धरण्याचे आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. ह्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी राजकिय नेते, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी आणि ओबीसी असणान्या सर्व जाती. ज्यामध्ये ओतारी, डोबारी, छप्परबंद मुस्लीम, माकडवाले, लभाणी, वेरड, रामोशी, मुस्लीम शाहा, मुस्लीम मदारी, मन्नेवार, बागवान व ओबीसी मध्ये समाविकोल्हाटी, नंदीवाले, वासुदेव, बहुरूपी, गारपगारी, जवेरी, कासार, भांड, छप्परभांड, मानभाव, परदेशी, लोथी आगरी, गुजर, भुते, मैराळ, वैद्, बाव्छप्परबंद, इराणी, ठाकूर, चितारी, काशीकापडी, गुरव, झिंगाभोई, मसनजोगी, फुलारी, गोपाळ, शिकलगार, वडार, राजपूत, भामटा, बेरड, गारू्डी,गोसावी, यादव, गवळी, रंगारी, बारी, लोणारी, लोहार, साळी, कलाल, भराडी, चित्रकथी, सुतार, गोवारी, हलया, नाथजागी, जोगी, मदारी, कैकार्डी,कुणबी, माळी, धनगर, तेली, वंजारी, बंजारा, कुंभार, धोबी, न्हावी, भोई, बेलदार, सोनार, कोळी, कोष्टी, शिंपी, भावसार, गोंधळी समाजाने या आंदोलनाचा प्रचार करावा व लाखोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी ब्हावे ! असे आवाहन समस्न ओ.बी.सी. समाज अकोला जिल्हा यांनी केले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/youth-congresskadoon-public-dam-kama-and-railway-department-lekhi-lekhi-mangani/