मुंबई – गोविंदाची पत्नी आणि अभिनेत्री सुनीता आहुजा सध्या तिच्या यूट्यूब चॅनेलमुळे चर्चेत आहे. फक्त चार व्हिडिओ टाकल्या असूनही तिला सिल्व्हर प्ले बटण मिळालं असून, हा आनंद तिने चाहत्यांसह सोशल मीडियावरही शेअर केला आहे.सध्या सुनीता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने व्हिडिओ बनवत आहे. गणेशोत्सवाच्या सुमारास तिने मीडियासमोर सांगितले की तिचे आणि गोविंदाचे नाते मजबूत असून कोणामुळेही ते तुटू शकत नाही. त्यामुळे चाहत्यांचा अंदाज आहे की त्यांच्या आधीचे वाद मिटले आहेत.यूट्यूब चॅनेलवर फक्त ४ व्लॉग टाकल्यावर मिळालेल्या प्रेमामुळेच सुनीताला सिल्व्हर बटण मिळाले. तिने हा आनंद सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले. पोस्टवर पुतण्या कृष्णाने ‘अभिनंदन’ लिहून हार्ट इमोजी दिली, तर सुनीताने उत्तर दिले, “धन्यवाद बेटा”. या कमेंटचा व्हायरल होणे पाहण्यासारखे ठरले आहे.हातात सिल्व्हर बटण घेऊन आनंद व्यक्त करताना सुनीताने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तिने पोस्टमध्ये म्हटले:
“माझ्या यूट्यूब चॅनेलसाठी सिल्व्हर बटण दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मला असेच सर्वांचे प्रेम हवे आहे.”
सध्या तिच्या पोस्टवर चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावर ती प्रचंड चर्चेत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/class-4-sathi-fakt-a-teacher/