कारंजा पोलिसांनी गणेश उत्सवात ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांचा सत्कार केला

कारंजा

डि. जे. मुक्त गणेश विसर्जन करणाऱ्या १३ गणेश मंडळांचा पोलीस विभागाकडून सत्कार

कारंजा (लाड) – नवदुर्गा उत्सव २०२५ च्या निमित्ताने पोलीस स्टेशन कारंजा ग्रामिण येथे विशेष बैठक घेण्यात आली. १५ सप्टेंबर रोजी सकाळी पोलीस अधिक्षक वाशिम अनुज तारे, अप्पर पोलीस अधिक्षक वाशिम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांनी सर्व नवदुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.बैठकीत नवदुर्गा उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण कायद्याचे काटेकोर पालन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, प्रत्येक मंडळाला सामाजिक जबाबदारीने आणि सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.विशेषतः, डि. जे. मुक्त गणेश विसर्जन करणाऱ्या १३ गणेश मंडळांचे सत्कार करण्यात आला. या सत्कारामध्ये पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले गेले. या गणेश मंडळांमध्ये प्रमुखतः तरुण उत्साही मंडळांचा समावेश होता.सदर बैठकीसाठी १२५ ते १५० पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंडळांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत, सुरक्षित आणि शांततापूर्ण गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमाने स्थानिक नागरिकांमध्ये एक जबाबदार व संस्कारी उत्सव साजरा करण्याची भावना अधिक दृढ केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/supreme-cortai-muth-intervention/