स्मार्टफोन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कम्प्युटरची कामं देखील या छोट्याश्या डिवाइसवर होत असल्यामुळे युजर्स नेट बँकिंग सारखी कामे देखील मोबाइलवर करत आहेत. त्यामुळे फोनमध्ये तुमची पर्सनल माहिती तर असतेच त्याचबरोबर बॅकिंग सर्व्हिस देखील असते. परंतु आता दिग्गज स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो बद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्यात कीबोर्डच्या स्ट्रोकवरून फोनमधील बँकिंग आणि सोशल मीडिया पासवर्ड चोरले जात आहेत.
अशी होत आहे युजर्सच्या पासवर्डची चोरी
जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवरून बॅकिंग पेमेंट किंवा सोशल मीडिया अॅप लॉगिन करता त्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो. परंतु काही खास कीबोर्ड बनवले जात आहेत, ज्यांच्या माध्यमातून ओळखलं जातं की तुम्ही कोणता लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकला आहे. यात कीबोर्ड स्ट्रोक रजिस्टर होतात. सिटिजन लॅबच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये अनेक कीबोर्ड अॅप्सची नावे समोर आली आहेत, ज्यात सिक्योरिटी रिस्क आहे. तसेच दावा करण्यात आला आहे की हे अॅप्स कीस्ट्रोक्स लीक करू शकतात. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या कीबोर्ड अॅप्सचा वापर सॅमसंग, शाओमी सारखे स्मार्टफोनमध्ये देखील करण्यात येत आहे.
कोणत्या कीबोर्ड अॅप्सचा वापर ठरू शकतो धोकादायक
- सॅमसंग कीबोर्ड
- Xiaomi वरील Baidu, iFlytek आणि Sogou की-बोर्ड
- विवो आणि ओप्पोचे सोगो आईएमे कीबोर्ड
- Honor मधील Baidu IME कीबोर्ड
रिपोर्टनुसार अशाप्रकारचे कीबोर्ड अॅप्स मोठयाप्रमाणात चीनमध्ये वापरले जातात, जे कीबोर्ड स्ट्रोक सर्वर मध्येस्टोर करतात. या कीबोर्ड स्ट्रोकच्या डेटामध्ये कोणत्या अॅप किंवा वेबसाइटवर कोणते कीज वापरले गेले याची माहिती असते. या माहितीवरून सोशल मीडिया आणि बँकिंग डिटेल्स सहज वेगळी जरा येतात.
Related News
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या
काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका
आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफ...
Continue reading
रिपोर्टनुसार, या सुरक्षा त्रुटींमुळे जगभरातील अब्जावधी युजर्सवर परिणाम होऊ शकतो. क्लाउड-आधारित कीबोर्ड फीचर्स वापरणाऱ्यांना सर्वाधिक धोका असतो, जे प्रिडेकटिबल मजकूर फिचरसाठी सर्व्हरवर डेटा पाठवतात.
यावर उपाय काय
- सतत तुमचं कीबोर्ड अॅप अपडेट करत राहा.
- अश्या कीबोर्ड अॅप्सचा वापर करा, जे स्ट्रोक डेटा डिव्हाइसवर ठेवतात.