शेतकरी आक्रोश मोर्चा

नाशिकमध्ये शेतकरी अधिकारांसाठी मोठा मोर्चा

नाशिक: नाशिक शहरात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मोठा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

मोर्चामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या प्रमुख नेत्यांनीही सहभाग नोंदवला. मोर्चा सुरू होण्याआधी राष्ट्रवादी पक्षाचे शिबीर नाशिकमध्ये पार पडले होते.

मोर्चाद्वारे शेतकऱ्यांच्या धान्यदर, पाण्याचे प्रश्न, कर्जमाफी आणि इतर विविध समस्या यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहभागी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत सरकारवर टीका केली आणि शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

read also :https://ajinkyabharat.com/police-more/