मुंबई: अंधेरी परिसरातील वयोवृद्ध महिलेची हॉलीवूड अभिनेता असल्याचं सांगून फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, 69 वर्षांच्या डाफनी रामचंद्र कामत यांना अज्ञात सायबर ठगाने भेटण्यासाठी पैसे मागितले. ठगाने स्वतःला कियानो चाल्स रिव्हज नावाचा हॉलीवूड अभिनेता असल्याचे सांगितले आणि भारतात भेटायला येण्यासाठी इंडियन करन्सीची गरज असल्याचे सांगून पैसे मागितले.
डाफनींच्या बँक खात्यातून 65 हजार रुपये ट्रान्स्फर झाले, जे डेहरादून येथील अशा नाहर या व्यक्तीच्या बँक खात्यात गेल्याचे उघड झाले.
डाफनींच्या मुली स्नेहा भावनानी, जिने लंडनमध्ये राहून बँक व्यवहार पाहतात, यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलीस संबंधित ठगाचा शोध घेण्यास आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/india-pakistanwar-vijay-mivala/