नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुंग्यांची चाल आणि बेडकांच्या हावभावाद्वारे पावसाचा अंदाज लावण्याच्या नव्या प्रकल्पासाठी 3.8 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ आणि एनआयटी कालिकत संयुक्तपणे हवामान अंदाजाच्या प्राचीन पद्धतींचा अभ्यास करतील.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सहा महिन्यांच्या कार्यक्रमात वैदिक आणि शास्त्रीय काळातील ग्रंथांचे अभ्यास केला जाईल.
बृहत्संहितासह अनेक ग्रंथांचा अभ्यास करून बेडकांचे वर्तन, मुंग्यांची हालचाल आणि विशिष्ट ढगांच्या निर्मितीद्वारे पावसाचा अंदाज कसा घेतला जात असे, हे समजून घेतले जाईल.
36 विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपयांचे स्टायपेंड दिले जाईल, जे सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल.
जुनी पद्धती सोप्या भाषेत उपलब्ध करून सर्वांसाठी माहिती सुलभ केली जाईल आणि डेटाबेस तयार केला जाईल.
तज्ज्ञांचे मत
दिल्ली विज्ञान फोरमचे डी. रघुनंदन यांनी या इंटर्नशिपला “पूर्णपणे निरुपयोगी प्रकल्प” म्हटले. त्यांचा म्हणणं आहे की, प्रकल्पाचा अंतिम निष्कर्ष आधुनिक विज्ञानाशी कसा जुळतो हे दाखवणं आवश्यक आहे.
टेरी स्कूल ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजचे व्हिजिटिंग प्रोफेसर एस.एन. मिश्रा म्हणाले,“कालिदास आणि इतर प्राचीन कवींनी लिहिलेल्या काव्यांमध्ये वातावरण आणि ऋतूंचे निरीक्षण स्थानिक पातळीवर अंतर्दृष्टी देते. या ज्ञानाला विज्ञानासोबत जोडल्यास हवामान माहिती अधिक अचूक होऊ शकते.”
सध्या या योजनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि लोकांमध्ये प्राचीन पद्धतींच्या माध्यमातून हवामान अंदाज घेण्याची उत्सुकता वाढत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/social-media-strong-discussion/