लोहारा (अकोला जिल्हा):अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल मोरे (अंदाजे वय ५६ वर्षे) यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.
माहितीनुसार, अनिल मोरे सायंकाळी शेगाववरून आपल्या घरी परतत असताना शेगाव ते लोहारा रोडवरील हॉटेल विश्वजीत समोर, एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले आणि तत्काळ ठार झाले.
अनिल मोरे यांच्या पश्चात दोन मुले आणि पत्नी आहेत. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची माहिती लोहारा येथील काही युवकांना मिळाली आणि त्यांनी तातडीने शेगाव येथील सईबाई मोट्य रुग्णालयात धाव घेतली. ही घटना समोर आल्यावर लोहारा गावात शोककळा पसरली आहे.
बातमी लिहेपर्यंत पोलिसांनी अपघाताबाबत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.
read also :https://ajinkyabharat.com/pakistani-team-mothi-gesture/