गावकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीनंतर यशस्वी निर्णय

शिक्षकांच्या नियुक्तीचा आनंद!

निंबा (बाळापुर तालुका): ग्राम निंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच नवीन रुजू झालेले तीन शिक्षक – गजानन नंदाने, राजेश पांडे आणि धर्मेंद्र रायबोर्डे यांचा सत्कार शाळा समितीच्या हस्ते आदरपूर्वक करण्यात आला.

गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून शिक्षकांची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले व प्रशासनाने नवीन शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली. या सत्कार सोहळ्यात ग्रामपंचायतीचे सरपंच ज्योतीताई सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिकेत तायडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ बोदडे, सुनील तायडे, आनंद तायडे, उद्धव गावंडे, पुरुषोत्तम सोनवणे, सचिन वानखडे, तसेच मुख्याध्यापिका वनिता बेले उपस्थित होते.

शाळा समिती सदस्यांच्या वतीने शिक्षकांना आदरांजली अर्पित करण्यात आली. शिक्षक नागेश सोळंके, चंदा पवार आणि गजानन खेडकर सर यांनीही सत्कार सोहळ्यात आभार प्रदर्शन केले.

नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मोठा हातभार लागणार असून, स्थानिक शैक्षणिक वातावरणाला चालना मिळणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/eyewitness-sangitle-rame/