वजेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक

वजेगावच्या प्रतिष्ठित नागरिक सुभाष माळी यांचे अल्पशा आजाराने निधन

जानोरी मेड  – वजेगाव:वजेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व श्री सुभाष देविदास माळी यांचे अल्पशा आजाराने दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुना माळी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.

श्री माळी यांची विशेष ओळख दैनिक अजिंक्य भारत वजेगाव प्रतिनिधी म्हणून होती. ते सुरुवातीपासून पत्रकारितेत कार्यरत असून, गावातील प्रत्येक घटना जनतेपर्यंत पोहोचवण्यास वचनबद्ध होते. तसेच वाचनाचा असामान्य छंद असलेले श्री माळी यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले होते.

या दु:खद घटनेने संपूर्ण वजेगाव परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिक, पत्रकार मित्र, समाजसेवी आणि परिचित व्यक्ती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना सर्वांच्या मनात व्यक्त केली जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/pravashanchi/