मुंबई: महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या काही महिन्यांपासून सिनेमाची चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या या सिनेमानं तीन दिवसांत चांगली कमाई केल्याचं दिसून येत आहे.
आपले आई-वडील मुलांप्रती असलेली सगळी कर्तव्य चोख बजावतात; पण तीच सगळी कर्तव्यं आई-वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं या सिनेमात मिळत आहेत. खरं तर गेल्या काही वर्षात या विषयांवरचे अनेक सिनेमे येऊन गेले, पण त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. पण महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचरनं मात्र वेगळेपण दाखवून दिलं आहे.
Related News
‘Hanuman Ansh’ची टीम थेट ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक, आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘Hanuman Ansh’ या आध्यात्मिक चित्रपटाची चर...
Continue reading
‘Hanuman Ansh सिनेमाला प्रेमानंद महाराजांची मोठी वॉर्निंग; निर्मात्यांना नेमकी कसली होती भीती? २ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींची कमाई
अध्यात्म, भक्ती आणि महान संतांच्या जीवनावर आधा...
Continue reading
'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची अधिकृत एण्ट्री झाली आहे. सोहम शहा आणि नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. तिची भूमिका, चित्रपटाची कथा, कलाकार आणि आगामी प्रो...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित हो...
Continue reading
मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत कॅन्सरवरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असल्याची माहिती दिली. सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन आणि कुटु...
Continue reading
धमाल 4 Box Office Collection Day 2: 36.50 कोटींचा ऐतिहासिक धमाका! दुसऱ्याच दिवशी 25 चित्रपटांना मागे टाकत 60% जबरदस्त वाढ
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाव...
Continue reading
राम चरण आणि जान्हवी कपूर स्टारर 'पेड्डी' हा 3 तास 7 मिनिटांचा स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासांत टॉप ट्रेंडिंगमध्ये नंबर-1 ठरला. बॉक्स ऑफिसवर 333 ...
Continue reading
'देऊळ बंद २'च्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत अनेक गंभीर दावे केले आहेत. टीझर नाकारल्यापासून सिनेमा पाडण्यासाठी बैठका झाल्याच्या आरोपांपर्यंत सर्व घड...
Continue reading
7 व्हायरल मीम्स! 'अल्फा'वर नेटकऱ्यांचा हल्लाबोल, 'बॉलिवूड नाही तर कॉपीवूड' म्हणत आलिया भट्ट ट्रोल
मुंबई : यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित 'अल्फा' चित्रपट अखेर...
Continue reading
पैशांपेक्षा मैत्रीचं ऋण मोठं! 'मर्दिनी'साठी जितेंद्र जोशीनं घेतलं 'शून्य' रुपये मानधन; संघर्षाच्या दिवसांची भावनिक आठवणमराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या मानधनाच्या आकड्यांची ने...
Continue reading
Pravin Tarde : 'देऊळबंद 2' ने 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडू नये! प्रवीण तरडेंचे 7 मोठे खुलासे; रितेश देशमुखच्या फोनची भावनिक गोष्टPravin Tarde ची मोठी इच्छा! 'देऊळबंद 2'ने 'राज...
Continue reading
रणवीर सिंह ठरला सर्वात महागडा अभिनेता : भारतीय चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस जागतिक स्तरावर नवे मानदंड निर्माण करत आहे. वाढते बजेट, भव्य कथा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि प्रेक्...
Continue reading
महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित सिनेमात ते सगळ्याच अर्थानं हिरो ठरतात. त्यामुळं त्यांचा प्रेक्षकवर्ग, चाहतावर्ग सिनेमाला गर्दी करताना दिसतोय. पहिल्यादिवशीपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमानं जास्त कमाई केली आहे. त्यामुळं माऊथ पब्लिसिटीचा फायदा सिनेमाला होताना दिसतोय.
sacnilk या वेब साइटवरच्या आकड्यांनुसार ‘जुनं फर्निचर’ सिनेमानं http://जुनं फर्निचरतीन दिवसांत दोन कोटींच्यावर कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सिनेमानं ४० लाखांचा गल्ला जमवला होता. तर त्यानंतर सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं.दुसऱ्या दिवशी सिनेमानं ७७ लाखांची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनमेानं तब्बल १.०२ कोटींची कमाई केली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि रविवार असल्यानं सिनेमाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. हे आकडे पाहाता सिनेमाच्या कमाईत आता आणखी वाढ होताना दिसू शकते. सिनेमाची तीन दिवसांची कमाई ही २.१९ कोटी इतकी आहे.
कलाकार कोण कोण?
दरम्यान, ‘सत्य-सई फिल्म्स’ आणि ‘स्कायलिंक एंटरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’चे तिन जाधव निर्माते आहेत. ‘जुनं फर्निचर’ची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांचेच आहेत. या सिनेमात महेश मांजरेकर यांच्यासोबतच मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या भूमिका आहेत.