जळगाव भडगावमध्ये हॉटेलात भयानक स्फोट, १०-१५ जण जखमी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात सकाळी मोठा स्फोट झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये सकाळी चहा पिण्यासाठी बसलेले दहा ते पंधरा ग्राहक अचानक मोठ्या स्फोटाचा बळी ठरले. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्फोटाचा आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या इमारती व परिसर हादरले.स्फोटानंतर नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने भडगाव व पाचोरा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार काही जखमींना गंभीर जखमा आल्या आहेत.स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. प्रारंभिक अंदाजानुसार, हा स्फोट गॅस सिलेंडर किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरमुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला हातभार लावला. त्यांनी जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती घेतली आणि प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले.भडगावकरांमध्ये या स्फोटामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी परिसर सील करुन तपास सुरू केला आहे. प्रशासन आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी तैनात असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे का याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. पुढील तपास पोलिस सुरू ठेवणार आहेत आणि स्फोटाचे कारण निश्चित होताच अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.
read also : https://ajinkyabharat.com/1xbet-betting-app/