जळगाव बिलवाडी : “माझ्याकडे पाहून का थुंकला?” – किरकोळ वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये भयंकर हिंसाचार, एकाचा मृत्यू, ११ जण जखमी
जळगाव : जिल्ह्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून आज तासो तास हिंसाचाराचा प्रकार उफाळला. “माझ्याकडे पाहून का थुंकला?” या किरकोळ कारणावरून गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये वाद चिघळला आणि लाकडी दांडे, पावड्या व इतर साहित्यांनी जोरदार मारामारी झाली.यात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही कुटुंबातील एकूण ११ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका महिलाची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर सध्या जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, “अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही” अशी भूमिका ठेवली आहे.
रुग्णालयात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
या घटनेचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.