तेल्हारा तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा

तेल्हारा

तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत भोपळे विद्यालयाचे तीन संघ जिल्हास्तरावर निवडले

तेल्हारा तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत भोपळे विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत तीन संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले आहेत. महाराष्ट्र शासन क्रीडा व शिक्षण विभागाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड येथील मुलींच्या संघांनी उत्कृष्ट खेळ सादर करत सर्वांना अभिमानित केले.१४, १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या संघांनी कौशल्यपूर्ण खेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.यामुळे तेल्हारा तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.खेळाडूंच्या संघभावना व मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, संस्था कार्यवाह श्यामशील भोपळे आणि संचालकगण यांनी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या उपस्थितीत महिला क्रीडा संयोजिका सौ. पद्मा टाले, क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे आणि क्रीडा सहसंयोजक गणेश भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश साकारले गेले आहे. भविष्यातही असेच उज्वल यश मिळावे अशी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/amravati-departmental-akhil-bharatiya-vidyarthi-science-menavyasathi-nivad/