अमरावती विभागीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड

विज्ञानात विस्फोटक यश!

कु. रिद्धी राऊत व कु. गार्गी रावळे यांचा उत्स्फूर्त पराक्रम

अमरावती विभागीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद वाशिम, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, माध्यमिक शिक्षण विभाग व विद्यानायक संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. सी स्कूल वाशिम येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या विज्ञान मेळाव्यात “कॉटम युगाची सुरुवात – संभाव्यता व आव्हाने” या विषयावर स्पर्धा झाली. एकूण १६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यापैकी कु. रिद्धी लक्ष्मण राऊत (श्रीमती एम. आर. नागवानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कारंजा) यांनी प्रथम आणि कु. गार्गी राजीव रावळे (आर. जे. चवरे हायस्कूल, कारंजा) यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या यशाबाबत विभागीय उपाध्यक्ष विजय भड, जिल्हाध्यक्ष संतोष गिऱ्हे, सहाय्यक संचालक आकाश आहळे आदी मान्यवर उपस्थित होते. विभागस्तरिय मेळाव्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्याचबरोबर सौ. वैभवी टाले, प्रियांशी इंदाने व अक्षरा अग्रवाल यांना प्रोत्साहन पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सचिव किशोर ऊडाळ व विज्ञान अध्यापक मंडळाचे सदस्य यांनी केले. या निवडीमुळे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-effective-results/