ईशान्य भारतात आज आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात 5.8 तीव्रतेचा भूकंप आला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, भूकंप दुपारी 4 वाजून 41 मिनिटांनी झाला आणि त्याची खोली फक्त 5 किलोमीटर होती.भूकंपाचे धक्के आसामसह मेघालय, नागालँड, मणिपूर, बंगाल आणि भूतानमध्येही जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि अनेक लोक घराबाहेर आले. सध्या प्रशासनाने सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. ईशान्य भारत हा भूकंप संवेदनशील भाग असल्यामुळे प्रशासन आणि नागरिक सतर्क राहणे आवश्यक आहे.काही दिवसांपूर्वीही आसाममधील सोनितपूर येथे 3.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. या भागात युरेशियन आणि सुंदा प्लेट्सच्या टक्करामुळे भूकंपाचा धोका कायम राहतो.
read also : https://ajinkyabharat.com/teaching-2/