“माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला 200 कोटी!

इथेनॉल पेट्रोल विवादावर चोख प्रत्युत्तर

मुंबई,  – गेल्या काही दिवसांपासून भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20 Petrol) वर चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल ब्लेंड फ्यूल विक्री अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. अनेकांनी या निर्णयामागे वैयक्तिक स्वार्थ असल्याचा आरोपही केला होता.

 यावर चोख प्रत्युत्तर दिले केंद्रीय महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अ‍ॅग्रीकॉस वेलफेअर सोसायटीच्या कार्यक्रमात केले. त्यांनी सांगितले,
“माझ्या बुद्धीची प्रत्येक दिवसाची किंमत 200 कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ शकत नाही.”

 तसेच, गडकरी म्हणाले,
“मी हे सगळं पैशांसाठी करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इमानदारीने पैसे कसे कमवायचे हे मला माहित आहे. विदर्भात साधारण 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न चालूच राहतील.”

 सरकारचा निर्णय आणि न्यायालयाचा निर्णय
इथेनॉल ब्लेंड फ्यूल अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत ग्राहकाच्या निवडीचा पर्याय राखावा, तसेच 2023 पूर्वी बनवलेल्या वाहनांवर यामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा उठवण्यात आला होता. मात्र, १ सप्टेंबर २०२५ रोजी न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

 E20 पेट्रोलचे फायदे

  • 2023 नंतर बनवलेल्या वाहनांसाठी अधिक उपयुक्त

  • स्वच्छ इंधन वापराच्या धोरणाचा भाग

  • देशाच्या इंधन स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

 वादाचे वातावरण
सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक तर्कवितर्क रंगले असून नागरिकांमध्ये आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. पुढील काळात या निर्णयामुळे काय परिणाम होतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/best-i-just-change-margat-moth/