BESTच्या बस मार्गात मोठे बदल

एल्फिन्स्टन पूल बंद

मुंबई, – मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या पूलला पाडून त्याच्या जागी नवीन ‘डबल-डेकर शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर’ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना आणि BESTच्या बस सेवा वापरणाऱ्यांना मोठा बदल अनुभवावा लागणार आहे.

BEST बस मार्गात झाले बदल

मार्ग क्रमांक १८८ :
प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग → भारत माता → संत जगनाडे चौक → कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक → ना. म. जोशी मार्ग → दीपक सिनेमा → परळ एसटी आगार.

मार्ग क्रमांक ए-१९७ :
प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौकातून वळण घेऊन हिंदामाता सिनेमामार्गे बस सेवा विस्तारित.

मार्ग क्रमांक १०१ :
प्रभादेवी पुलाऐवजी परळ डेपो / संत रविदास चौक वळविण्यात येईल. प्रभादेवी पुल पाडण्यासाठी मध्य पश्चिम रेल्वेला ब्लॉक लागणार असून लवकरच नियोजन करण्यात येणार आहे.

 पर्यायी मार्ग

दादर पूर्वकडून पश्चिमेला जाण्यासाठी → टिळक पूल वापरा

परळ पूर्वकडून प्रभादेवी, लोअर परळला जाण्यासाठी → करी रोड पूल वापरा

प्रभादेवी, लोअर परळकडून केईएम, टाटा हॉस्पिटलकडे जाण्यासाठी → करी रोड पूल

परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड, सी लिंककडे जाण्यासाठी → चिंचपोकळी पूल

 नागरिकांनी प्रवासात काळजी घ्यावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेचा सुलभ उपयोग करावा.

 महत्वाची माहिती

मुंबईतील पहिला डबल डेकर ब्रीज लवकरच बांधकामासाठी परवानगी मिळाल्यावर १ वर्षात पूर्ण होणार आहे.

हा बदल नवी मुंबई विमानतळाच्या अभूतपूर्व कनेक्टीव्हिटीसाठी गेम चेंजर ठरणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/shekado-hectare-shetzmin-panyakhali/