राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना कार्यान्वित केल्यावर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळणार असून त्यांचे डिजिटल रेकॉर्डही तयार केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
डिजिटल रेकॉर्डिंग व कायदेशीर मान्यता
शिवरस्ते, पाणंद आणि वहिवाटेला कायदेशीर मान्यता देण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS – Geographic Information Systems) वापरून त्यांना एक भू-सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहे. गावात मंजूर झालेल्या रस्त्यांची माहिती भूमिअभिलेख कार्यालयात वर्ग करण्यात येईल. एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या पाणंद रस्त्यांना ‘VR नंबर’ देण्यासाठीही प्रस्ताव पाठवला जाईल.
नकाशा कसा तयार केला जाणार?
प्रथम गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने अतिदक्षपणे सीमांकन केले जाईल. नकाशावर सर्व पाणंद रस्ते समाविष्ट केले जातील आणि पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध केले जातील.
विशेषतः १३ विविध योजना योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. या योजनेच्या कामकाजासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रांताधिकारी सदस्य सचिव, तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमि अभिलेख अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी कार्य करतील.
नोंदीसाठी नवे फॉरमॅट
नकाशावर प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 द्वारे जुन्या आणि नव्या रस्त्यांची माहिती समाविष्ट केली जाईल. प्रत्येक गावासाठी नव्या प्रकारची जमीन नोंदवही (फ नमुना) तयार करून ती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल.
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना काय आहे?
‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोषणेनुसार सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य व सुलभ रस्ता उपलब्ध होईल, यावर भर दिला जातो.
योजनेसाठी राज्य सरकार सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देणार असून मतदारसंघनिहाय समिती स्थापनेतून कामकाज प्रभावी पद्धतीने राबवले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी हे पाऊल आर्थिक व कायदेशीर दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आता पाणंद रस्त्यांचे डिजिटल रेकॉर्डमुळे भविष्यात वाद टळतील आणि शेतकरी हितसंबंध अधिक सुरक्षित राहतील.
read also :https://ajinkyabharat.com/%e0%a5%b2-luminium-foil-butter-paper/