ओडिसा, कंधमाल: एका शाळेच्या वसतीगृहात धक्कादायक घटना घडली आहे. फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम शाळेत एका विद्यार्थ्याने रात्री इतर आठ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकल्याचे समोर आले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि शाळेत खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आठ विद्यार्थी झोपेत असताना हा प्रकार घडला. अचानक डोळ्यात फेविक्विक लागल्यामुळे विद्यार्थी घाबरले आणि पळत-पळत रुग्णालयात पोहोचले. त्यांच्या डोळ्यांना थोडाफार इजा झाली असून, सात विद्यार्थ्यांना फुलबानी जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले आहे, तर एका विद्यार्थ्याची प्रकृती तुलनेने सुधारली असल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे गंभीर नुकसान टळले, पण विद्यार्थ्यांना अजूनही निगराणी आवश्यक आहे.
या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक मनोजंजन साहू निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून, घटनेवेळी वॉर्डन कुठे होता आणि विद्यार्थ्यांवर फेविक्विक कसे पडले याचा तपास सुरू आहे.
ही घटना शाळा प्रशासनाची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करते, त्यामुळे प्रशासनाकडून कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.
read also :https://ajinkyabharat.com/ranbir-kauracha-tremendous-fan/