भोकरदन तलाठ्याचा धक्कादायक प्रकार; विकलांग महिलेला अर्जासाठी बिअर बारमध्ये सामोरं आणण्याची मागणी
जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागातील नाजा सज्य तलाठ्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुनीता जाधव या महिलेच्या नातेवाईकांनी तलाठ्यांना संपर्क साधला असता, तलाठी नशेत असल्याचे उघड झाले.
तलाठ्यांनी नातेवाईकांना बिअर बारमध्ये बोलावून पैशाची मागणी केली. नातेवाईक बिल भरण्याचा नकार दिल्याने तलाठ्यांनी अर्जावर केलेली सही खोडली आणि महिलेला बारमध्येच सामोरं आणण्याची मागणी केली. या घटनेचे संपूर्ण दृश्य नातेवाईकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे.
भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा गावातील सुनीता जाधव यांनी अर्ज करताना अर्जावर तलाठ्यांची सही आणि शिक्का आवश्यक होते. मात्र तलाठी भेटत नसल्याने अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेत ही तक्रार समोर आली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आणि खळबळ निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेने सरकारी यंत्रणेत नशेत असलेल्या अधिकार्यांच्या गैरवर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप आहे.
read also :https://ajinkyabharat.com/junya-preyasine-ghadwale-kidnapping/