जुन्या प्रेयसीने घडवले अपहरण; १४ तासांत तरुणाची सुटका, बीडमध्ये चक्रावलेले प्रेमसंबंध उघडे
बीड – बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण आणि बेदम मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. नागनाथ ननवरे या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दहा जणांना ताब्यात घेतलं असून, त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत. तपासात अपहरण झालेल्या तरुणाची चौदा तासांत सुटका करण्यात आली.
तपासात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. नागनाथ ननवरे यांचे यापूर्वीच्या जुन्या प्रेयसी ज्योती काळे हिनेच सुपारी देऊन अपहरण घडवून आणल्याचं उघड झालं आहे.
नागनाथ आणि दीया यांचे प्रेमसंबंध जुळले होते. अकरा वर्षांपूर्वी ते दोघे पळून बीडमध्ये आले होते आणि तेव्हापासून ते सोबत वास्तव्यास आहेत. दीयाचे पहिले लग्न २०११ मध्ये संतोष पवार यांच्यासोबत झाले होते, मात्र त्याला दारूचं व्यसन असल्याने विवाह टिकलेला नव्हता.
या घटनेमुळे बीडमधील या प्रकरणाने स्थानिक लोकांचं लक्ष वेधलं आहे, तसेच जुन्या प्रेमकथेचा खुलासा करत पोलिसांची कारवाईही चर्चेत आली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/ardha-pakistani-fool-rajkarni/