विद्यार्थी व गावकऱ्यांचे अश्रू नयनांनी फुटले

; विद्यार्थ्यांच्या अश्रूंच्या ओघात भावनिक क्षण

पातुर नंदापूर  – येथील गट ग्रामपंचायत सोनखास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक मंगेश लिफ्ते व गजानन देशमुख यांच्या अचानक बदलीचा मेसेज आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना हे समजताच शाळेच्या आवारामध्ये एकच खरबड उडाली.

अकोला पंचायत समितीच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनखास गावातील ही शाळा २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांसाठी ओळखली जात होती. मात्र, मंगेश लिफ्ते व गजानन देशमुख यांनी शाळेची कायापालट केली. विद्यार्थ्यांना फिल्टरचे पाणी, संगणक सुविधा, लाऊड स्पीकर, रंगरंगोटी, बगीचा, तसेच सेमी इंग्लिश शिक्षण देत शाळेचे नाव उंच शिखरावर पोहोचवले.

शाळेला २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अकोला यांच्या वतीने कृतिशील शाळा पुरस्कार प्राप्त झाला होता. मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत उपजिल्हाधिकारी महेश फरंदेकर यांनी शाळेला भेट दिली होती. रणजीत पाटील यांच्या हस्ते शाळेला प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह व १ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला होता.

विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये शाळेतील शिक्षकांची अचानक बदलीची बातमी समजताच अश्रू नयनांनी फुटले. गावकऱ्यांनी नवीन शिक्षकांचा सत्कार करण्यास सांगितले आणि शाळेचा कारभार पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे उत्तम रीतीने चालावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्याध्यापक: भावना खंडारे
सहशिक्षिका: ज्योती वाडेकर

या घटनेमुळे सोनखास गावातील शिक्षणाच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त करण्याची भावना परत एकदा दिसून आली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/social-mediavar-ughdakis-aale-toxic-relationship/