मुंबई, – अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या पती आणि बिझनेसमन विकी जैनला अपघातानंतर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकीच्या उजव्या हातात काचेचे अनेक तुकडे रुतल्यामुळे त्याला 45 टाके बसले आहेत. तीन दिवसांपासून त्यावर उपचार सुरू असून त्याची सर्जरीही करण्यात आली आहे.
‘बिग बॉस 17’चा स्पर्धक समर्थ जुरैलने सोशल मीडियावर विकीचा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये विकी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना दिसला. या व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी विकीच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली. अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या जवळच्या मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंहने एक पोस्ट लिहून संपूर्ण परिस्थिती समजावून दिली.
संदीप सिंहने म्हटले आहे की, विकीच्या हातावर गंभीर दुखापत झालेली असून, तो अतिशय धाडसाने परिस्थितीचा सामना करत आहे. “अंकिता तू सुपरवुमन आहेस,” असं संदीपने अंकिताला समर्थन देत म्हटलं आहे. विकीचा प्रकृती सध्या स्थिर असून तो हळूहळू बरे होत आहे.
विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांची प्रेमकहाणीही चर्चेचा विषय राहिली आहे. सुशांत सिंह राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताने विकीला डेट करण्यास सुरुवात केली आणि 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं. आता हा दु:खद अपघात त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का ठरला आहे.
अद्याप विकीचा अपघात कसा आणि कुठे झाला, याची अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, चाहत्यांनी आणि सर्वजण त्यांच्या जलद बरे होण्याची प्रार्थना केली आहे.
read also:https://ajinkyabharat.com/cancellation-of-hanyachi/