अन्वी मिर्झापूर (बोरगाव मंजू) : समाज सुधारक व शिक्षणप्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित “मी महात्मा फुले बोलतोय” या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन अन्वी मिर्झापूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेत करण्यात आले. हे नाट्यप्रयोग अकोला येथील नाट्यकलावंत प्राध्यापक पुंडलिक भामोदे यांनी सादर केले.
दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता झालेल्या या कार्यक्रमात प्रा. भामोदे सरांनी प्रेक्षकांसमोर महात्मा फुले यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटना व त्यांचे विचार प्रभावी पद्धतीने मांडले. सुरुवातीला महापुरुषांचे अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कुकडे, माजी सरपंच प्रशांत नागे व सिने नाट्यकलावंत डॉ. राजकुमार वैराळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र पाटोळे यांनी प्रा. भामोदे यांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी भरभरून या नाट्यप्रयोगाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक भागवत टेकाळे, प्रतिभा पाठवणे, स्मिता वाघ, भारती वासनिक, दीक्षा मोहोड यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
हा नाट्यप्रयोग महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेसाठी केलेल्या योगदानाची जाणीव जागविणारा ठरला असून समाजातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना प्रबोधन करण्याचा एक प्रभावी माध्यम ठरला. प्रशासन व शालेय व्यवस्थापनाने अशा उपक्रमांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
read also :https://ajinkyabharat.com/satara-gazhet-implemented/