गिरीश कुमारचा बदललेला लूक व्हायरल

लूक पाहून चाहते झाले आश्चर्यचकित!

मुंबई, 14 सप्टेंबर 2025 – बॉलिवूडमध्ये ‘रमैया वस्तावैया’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता गिरीश कुमार सध्या अभिनयापासून दूर असून त्याचा बदललेला लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
 वांद्र्यातील एका जिममधून बाहेर पडताना पापाराझींनी गिरीशचा व्हिडीओ शूट केला आणि तो झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 गिरीश कुमारचा बदललेला लूक

‘रमैया वस्तावैया’ चित्रपटात चॉकलेट बॉय म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून गिरीशने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, आता त्याचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
 व्हिडीओमध्ये तो पापाराझींना सांगतोय की, तो सध्या वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र तरीही त्याचा बदललेला लूक लक्षवेधी ठरला आहे.

 जबरदस्त संपत्ती

अभिनयापासून दूर राहून गिरीशने कुटुंबीय व्यवसायाकडे वळलं आहे.

 त्याची एकूण संपत्ती: ₹2164 कोटी

 कंपनीचं भांडवल: ₹10,157 कोटी रुपये
सध्या तो ‘टिप्स इंडस्ट्रीज’ चा मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून कार्यरत आहे.
 गिरीश कुमार हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता एस. तौरानी यांचे पुत्र आहेत.

चाहत्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला प्रोत्साहित केले, तर काहींनी त्याच्या बदललेल्या लूकवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

read also :https://ajinkyabharat.com/harbor-railway-megabblock-local-service-stalled/