“साहित्य वाचन – जिवन घडवण्याचा अमूल्य मार्ग

साहित्य वाचनाने माणूस घडतो

श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर येथे “इंग्रजी साहित्य वाचन : गरज आणि महत्त्व” या विषयावर नुकतीच एक सखोल विचारमंथन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रकाश वानखडे यांनी साहित्य वाचनाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की,
“साहित्य वाचनाने माणूस घडतो. ड्रामा, नॉव्हेल, पोएट्री वाचन केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, मनाला सुमन करण्यासोबत विचारांना चालना देते. अक्षर साहित्य वाचकाचे मन व विचार अनुभवाने समृद्ध करते.”

कार्यक्रमाची सुरुवात श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मनिषा यादव होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. अनिल ठाकरे आणि प्रा. डॉ. दिलीप कोल्हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे मनोमन स्वागत केले.प्रास्ताविकात प्रा. श्रीया तांबडे यांनी इंग्रजीला संवादभाषा म्हणून स्वीकारल्यास त्याचे फायदे स्पष्ट केले. त्यांनी शेक्सपिअरच्या “मॅकबेथ” मधील महत्त्वाकांक्षी नायक, “रोमियो-ज्युलिएट” मधील प्रेमाची गाथा व ईमिली डिकन्सन यांच्या कवितांचे भावविश्व साध्या इंग्रजीतून समजावले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. मनिषा यादव म्हणाल्या,
“साहित्य वाचताना आपण विविध पात्रांचे जीवन अनुभवतो, जे आपल्याला नवे विचार, नवे अनुभव आणि जगण्याचे नवे रूप समजण्यास मदत करतात.”

कार्यक्रमात प्रा. विजय बेलखेडे, प्रा. एस. शामसुंदर, डॉ. कांचन मिसाळ, प्रा. डॉ. नरेश बनसोड, प्रा. डॉ. अर्चन गायकवाड, प्रा. भारती बाजड, प्रा. राजेंद्र वाकडे, प्रा. सुप्रिया इंगोले आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन प्रा. डॉ. मीनल तायडे यांनी केले, तर आभार प्रणाली वानखडे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साहित्य वाचनाची गरज आणि त्याचे फायदे आत्मसात करून त्यामध्ये अधिक रुची दाखवण्याचे महत्त्व जाणवले.

read also :https://ajinkyabharat.com/suicide-mage-motha-reveal-hyderabad-gazhetpramanye-banjara-samajala-reservation-dyave-as-magitle-32-year-old-tarunacha-shevatcha-word-ughdak/