पुसद : उटी येथील श्री गजानन महाराज संस्थान कडून आयोजित पालखी उटी ते शेगाव वारी मार्गावर दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी प्रस्थान झाली. पुसद येथे पालखीचे मोठ्या उत्साह व भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.ह.भ.प. तानाजी बापू यांच्या नेतृत्वाखाली जाणारी पालखी टाळ–मृदुंगाच्या तालाने वातावरण उत्साही बनले. मुसळधार पाऊस सुरू असताना पालखी येताच पाऊस थांबला, तर हजारो भक्त आणि वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था गावंडे परिवाराकडून करण्यात आली.पालखीने पुसद येथे थोडी विश्रांती घेतली आणि गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यावर शनी मंदिर मार्गे भोजला येथे प्रस्थान केले.पालखीच्या आरोग्य आणि आवश्यक औषधांची व्यवस्था स्व. जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उटी चे अध्यक्ष प्रशांत गावंडे यांनी केली.पुसद येथे उपस्थित होते: पुसद अर्बन बँक अध्यक्ष शरद मेंद, ज्येष्ठ वकील विवेक देशमुख, पत्रकार संघाचे रवी देशपांडे, डॉ.उत्तम खांबाळकर, डॉ.विशाल गोटे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आशिष कदम, भानुदास महाराज येळेगाव संस्थांचे उपाध्यक्ष गजानन गावंडे, उत्तमराव वानखेडे, तानाजी महाराजांच्या परमभक्त बाळासाहेब जाधव, उटी गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष मारोतराव ठाकरे, हिवरा गावचे उपसरपंच राजूभाऊ धोतरकर यांसह पुसद परिसरातील व्यापारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.पालखीचे दर्शन घेऊन भक्तांनी आशीर्वाद घेतला. नगरपरिषद पुसद यांनी पालखीच्या स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.पालखी पुढील मार्गावरून वनवारला, लाखी पारडी, आसरा, सावरगाव (बर्डे), मेडशी, बाभूळगाव, बाळापुर मार्गे 20 सप्टेंबर 2025 रोजी शेगाव येथे पोहोचणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/district-representation-definition/