जिल्हास्तरीय प्रतिनिधित्व निश्चित, पण पुढचा सामना कोणत्या स्तरावर?”

जिल्हास्तरीय

पातूर: महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशनच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, ते जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पातूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या स्पर्धेत तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सहभाग घेतला. वेळेवर विषय दिल्याबरोबर स्पर्धकांनी इंग्रजी भाषेत आपले मनोगत व्यक्त करणे आवश्यक होते. त्यानुसार ब गटातून ऋतुजा राठोड आणि अ गटातून शाफे खान सोयब खान यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.कार्यक्रमाचे अध्यक्ष किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे होते, तर प्रमुख अतिथींमध्ये कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशनचे पातूर तालुका अध्यक्ष बळीराम वानखडे, बाळादेवी कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक बाबुराज रामास्वामी, किड्स पॅरडाईजचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशनच्या पातूर तालुका उपाध्यक्ष अलका बयस यांनी केले. तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थीही कार्यक्रमात उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/anvi-mirzhapuramadhyay-me-mahatma-phule-boltoy/