अन्वी मिर्झापूरमध्ये “मी महात्मा फुले बोलतोय” एकपात्री नाट्यप्रयोग संपन्न

मी महात्मा फुले बोलतोय

बोरगाव मंजू : अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेत दिनांक 12 सप्टेंबर रोजी प्राध्यापक पुंडलिक भामोदे यांनी “मी महात्मा फुले बोलतोय” हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला.प्रयोगाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि प्रेक्षकांसमोर त्यांच्या इतिहासाची झलक उभे राहिली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचे अभिवादन करून करण्यात आली.जिल्हा परिषद शाळेतर्फे मुख्याध्यापक राजेंद्र पाटोळे यांनी प्रा. भामोदे सरांचे तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कुकडे, माजी सरपंच प्रशांत नागे, सिने–नाट्य कलावंत डॉ. राजकुमार वैराळे उपस्थित होते.विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक भागवत टेकाळे, प्रतिभा पाठवणे, स्मिता वाघ, भारती वासनिक, दीक्षा मोहोड यांनी परिश्रम घेतले.

read also : https://ajinkyabharat.com/deori-gavat-daru-decorate-action/