रिसोड : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोडप बु येथे सात वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षक अमोल अंभोरे यांची नुकतीच बदली झाली. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि गावकऱ्यांनी त्यांना (दि.१३)भावनिक निरोप दिला.समारंभात विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांची उधळण करून शिक्षकांचा सत्कार केला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, तर काहींनी शिक्षकांसमवेत शेवटच्या क्षणांचे फोटो टिपले. विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत भेटण्याची आशा व्यक्त करत अंभोरे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी गावातील नागरिक आणि शिक्षक वर्गही उपस्थित होता, ज्यांनी शिक्षकांच्या अपवादात्मक शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.अंभोरे यांची शाळा आणि विद्यार्थ्यांवरील सेवा आठवणींमध्ये सदैव जपली जाईल, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
read also : https://ajinkyabharat.com/37-gavanamadhyay-youths-training-solarza-project-vastigriha-tribal-vikas-gati/