अकोला जिल्ह्यातील दगडपारवा लघु प्रकल्प सध्या १००% क्षमतेने भरले असून, धरण प्रशासनाने पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज पूर नियंत्रण कक्ष, दगडपारवा प्रकल्प, अकोला यांच्या माहितीनुसार, धरणाची वक्रद्वार क्रमांक 1 आणि 4 प्रत्येकी २० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे. त्यानुसार प्रति सेकंद सुमारे १६.५६ घनमीटर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला जात आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत वाढणाऱ्या पावसामुळे येणाऱ्या पाण्याचा ताण कमी करण्यासाठी ही महत्त्वाची उपाययोजना करण्यात आली आहे.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत सतर्क राहावे, नदी पात्र ओलांडू नये व गावपातळीवर विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदर पावसाळी उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केली जात आहे. प्रशासनाने परिस्थितीचे काटेकोरपणे निरीक्षण सुरु ठेवले असून, नागरिकांनी धैर्य ठेवावे, असेही सांगितले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/both-accused-lcb-polisani-thoklya-bedya/