खासदार प्रणिती शिंदे आयुक्तांवर भडकल्या

खासदार

सोलापुरात अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्ते वाहून गेले, घरे पाण्याखाली गेले आणि नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला आहे. या घटनेनंतर सोलापुरातील परिस्थितीवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्तांवर थेट तिखट आरोप केले आहेत.प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना जाब विचारत, म्हणाले,

“या संकटात आपण काय करत होता? मला आत्ताच्या आत याचे स्पष्ट स्पष्टीकरण हवे!”

खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतप्त होऊन संबंधितांना तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोलापूर महापालिकेत आणि प्रशासनात मोठा गदारोळ माजला आहे.सध्या प्रशासन आणि महापालिका अधिकारी आपली बाजू मांडण्यासाठी तयारी करत आहेत, तर पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/charlie-kark-yanchaya-suddenly-murdered/