अडगाव : तेल्हारा तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा केळीच्या लागवडीकडे वळले होते, मात्र सध्याच्या हंगामात केळीच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीचा कालावधी असूनही केळीला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.गेल्या काही वर्षांत जलस्रोतांतील घट झाल्यामुळे तालुक्यात केळीची लागवड कमी झाली होती. मात्र, यंदा विहिरींमध्ये पाण्याचा मुबलक साठा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा केळी लागवड सुरू केली. मागील महिन्यात क्विंटलसाठी १८०० रुपये दर मिळाले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा या महिन्यासाठी वाढली होती.पण सध्याच्या बाजारात केळीचे दर फक्त ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल इतकेच राहिले. उत्पादनाचा खर्च वसूल न होत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. बागेची देखभाल, मजुरी, खते, पाणी यासाठी मोठा खर्च होतो, त्यावर बाजारभावाची घसरण ही संकटाची छाया ठरली आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीमुळे केळी वाहतूक ठप्प झाली, परिणामी इतर राज्यांमध्ये माल पोहोचू शकला नाही. काही शेतकरी असा देखील संशय व्यक्त करतात की, भाव जाणूनबुजून खाली केले गेले असावे. या परिस्थितीमुळे केळी उत्पादकांच्या आर्थिक स्थितीवर सामान्य परिणाम नाकारता येणार नाही.
स्थानिक शेतकरी अनुभव:
“माझी ४ एकर केळी लागवड आहे. मागील महिन्याच्या तुलनेत भाव निम्मे झाल्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने केळीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी,” अशी तक्रार एका शेतकऱ्याने व्यक्त केली.सध्या शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने हस्तक्षेप करून बाजारभाव स्थिर करावा, विक्रीसाठी स्थानिक व राज्यस्तरीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अन्यथा अनेक बागायतदार मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणार आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/female-aani-magasavargana-mothi-sandhi/