मुर्तीजापुरमध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे जंगी स्वागत

मुर्तीजापुरमध्ये

मुर्तीजापुर : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांचे आगमन होताच शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रथम आगमन प्रसंगी त्यांचे राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम गाणे वाला आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष संदीप जळमकर यांनी त्यांचे सत्कार केला.यावेळी येणाऱ्या निवडणूक संदर्भातील रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले.सदर प्रसंगी उपस्थित होते:माजी मंत्री राजेंद्र शिंगणे,माजी राज्य मंत्री गुलाबराव गावंडे,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे,श्याम अवस्थी, प्राध्यापक विश्वनाथ कांबले, दिलीप आसरे,जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे,माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर पाटील,निजाम इंजिनियर, अध्यक्ष राम कोरडे, पिंटू वानखडे, रफिक सिद्दिकी (पूर्व महापौर),जावेद जकरिया, समीर खान, इरफान अजमेरी, अलीम, वसीम गब्बर, अकबर, कलीम खान, जावेद, नासिर ठेकेदार, सागर कोरडे व इतर मुर्तीजापुरचे पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येमुळे स्वागत समारंभ भव्य स्वरूपात पार पडला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी मोर्चाबांधणी आणि संघटनात्मक तयारी हाती घेण्याचे निर्देश दिले.या कार्यक्रमामुळे मुर्तीजापुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची राजकीय उपस्थिती अधिक दृढ झाल्याचे दिसून आले, तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

read also : https://ajinkyabharat.com/hyderabad-gazhetan-according-to-gorbanjara-samajala-st-reservation-danyachi-magani/