युवकांनी महावितरण विभागाला दिले तातडीने सुधारणा करण्याचे निवेदन

युवकांनी

रिसोड : शहरातील नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेसाठी धोकादायक स्थिती उद्भवली आहे. शहरातील अनेक पोल झुकलेले असून, वीजेच्या तार लटकल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना संभाव्य अपघाताची भीती निर्माण झाली आहे.यासंदर्भात शहरातील युवकांनी कार्यकारी अभियंता महावितरण विभाग  रिसोड यांना १२ सप्टेंबर रोजी निवेदन दिले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, लोणी रोडवरील लोणी फाटा रस्त्यातील पोल काढावे, मुल्ला गल्लीतील थ्री फेज कनेक्शन दुरुस्त करावे, कदम लेआउटमध्ये नवीन पोल बसवावे, आनंदी चौक व जिजाऊ नगरातील घरांवरील लाईनचे तार उंच करावेत, गौसपुरा व इंदिरानगरमधील झुकलेल्या पोल दुरुस्त करावेत, तसेच नागरिकांसाठी नवीन वीज मीटर तातडीने उपलब्ध करून द्यावे.निवेदन देताना शेख अजिज, मो. आसिफ, सागर अग्रवाल, गणेश थोरात, शिवराज जहीरव, जावेद, अरबाझ, उमेद, इमरान खान, शोहेब अली, जमिर आदी नागरिक उपस्थित होते. निवेदनात, हे काम लवकरात लवकर न केल्यास महावितरण कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.शहरातील नागरिकांसाठी वीजेच्या सुरक्षिततेसाठी ही तातडीची मागणी मान्य होणे आवश्यक आहे.

read also : https://ajinkyabharat.com/talukat-secret-fame/