मुर्तीजापुर : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 आणि राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2025-26 च्या जिल्हास्तरीय स्पर्धा प्रभात किड्स, अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.सदर स्पर्धेत श्री व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेचा विषय ‘स्मार्ट शेती’ होता. नाटिकेच्या लेखिका व दिनदर्शिका प्रीती माटोडे, सहाय्यक शिक्षिका रूपाली वाघ होत्या.सहभागी विद्यार्थ्यांमध्ये ओम अधानक, ईश्वरी देशमुख, जय भुगूल, कैवल्य महाजन, देवेन म्हसाये, जानवी गोरले, विदिशा कुंभारे, संकल्प सरदार यांचा समावेश होता. त्यांनी नाटिका प्रस्तुत करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.तसेच नॅशनल सायन्स सेमिनार स्पर्धेत नववीच्या शौर्य गुप्ता यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेसाठी आणखी एक गौरव वाढवला. शिक्षक अमित पोटे यांनी मार्गदर्शन केले.शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अवधूत ज्ञानेश्वर ढेरे, सचिव राजश्रीताई गोळे, मुख्याध्यापिका सारिका ताई कडू, पर्यवेक्षिका मीनाक्षी ताई महाजन यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
read also : https://ajinkyabharat.com/lohara-te-dongargaon-rastyavar-jeevaghenya-khadyaancha-dhoka/