लोहारा ते डोंगरगाव रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचा धोका

महत्वाचा ग्रामीण मार्ग खड्ड्यांच्या साम्राज्यात

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा ते डोंगरगाव या नवीन रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे झाले असून स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. या रस्त्याचे बांधकाम करताना ठेकेदारांनी डांबराचा वापर आवश्यकतेपेक्षा कमी केला असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता लोहारा, डोंगरगाव, कळंबा, कसुरा, कोळासा आणि बाळापूर शहराला जोडतो.परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, या खड्ड्यांमुळे दररोज लहान अपघात होत असून, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता असताना सध्या प्रशासनाची दुर्लक्षाची भूमिका दिसून येत आहे. “जर या खड्ड्यांमुळे कुणाचा जीव गेला तर बांधकाम विभाग उत्तरदायी राहील,” अशी तक्रार ग्रामस्थ करत आहेत.शेतकरी पिकवलेले माल बाजारात पाठवण्यासाठी, विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सद्यस्थितीत रस्त्याची बिकट अवस्था नागरिक

read also : https://ajinkyabharat.com/ambernath-crime/