बाळापूर –अकोला जिल्ह्यातील बाळापूर ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. ११ सप्टेंबर रोजी हिंगणा-संभापुर भागातील दोन युवक दुचाकीवर बाळापूरकडे जात असताना अचानक समोर आलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाला.
अपघातात ३० वर्षीय अतुल अंबादास कवळकार यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर गजानन साबे गंभीर जखमी झाले. जखमी युवकाला तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, दिवसभर घरावरील स्लॅब वाहून हिंगणा-संभापुर येथून बाळापूरकडे येताना दुचाकी क्रमांक MH-28-EQ-4118 वरील संतुलन बिघडल्याने अपघात घडला. बाळापूर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुरवाडे पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे महामार्गावरील खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे, अन्यथा आणखी अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
read also :https://ajinkyabharat.com/qaida-system/