अभिनेत्री कुनिका सदानंद ‘बिग बॉस 19’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. या सिझनमध्ये तिचा झीशान कादरीशी चांगला मैत्रीपूर्ण नाताच दिसत आहे. सोशल मीडियावरही दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे.
कुनिकाचे मागील विवाह इतिहासही रोचक आहे. दिल्लीच्या अभय कोठारीशी तिचे पहिले लग्न झाले होते. नंतर वयाच्या 35 व्या वर्षी तिने विनय लालशी दुसरे लग्न केले, ज्यातून अयान नावाचा मुलगा आहे. 80 च्या दशकात कुनिकाचे नाते अभिनेते प्राण यांच्या मुलासोबत सुनिल सिकंदशी आणि 90 च्या दशकात प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याशी जोडले गेले होते.
शोमध्ये झीशान कादरीशी तिची जवळीक पाहून अयानने मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली. अयान म्हणाला, “झीशान कादरी आणि माझ्या आईमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. झीशान भाईसुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होतोय. जर माझ्या आईची त्या नात्याला सहमती असेल तर मला काही हरकत नाही.”
आणखी अयान म्हणाला, “मी त्यांना झीशान अंकल असं म्हणेन. परंतु दोघंही तापट स्वभावाचे आहेत, त्यामुळे थोडंसं सांभाळून राहावं लागेल. वीकेंड का वार एपिसोडमध्ये आईचा हात पकडताना मला खूप चांगलं वाटलं.”
दरम्यान, बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान कुनिकाने मस्करीत झीशानला लग्नासाठी प्रपोजदेखील केले होते. आता प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की, 61 व्या वर्षी कुनिका तिसरं लग्न करण्याच्या मार्गावर आहे का?