खळबळजनक प्रकरण

पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोर्चाआधीच आरोपी ताब्यात

अकोला  –अकोल्यातील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकरण पोलिसांनी उघड केले आहे. आरोपी तौहिद समीर याला अकोला पोलिसांनी सहा दिवसांच्या तपासानंतर मध्यप्रदेशच्या इंदोरमधून ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या घरचे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या वेळेचा फायदा घेत घरात प्रवेश केला आणि चाकूचा धाक दाखवून मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे अकोल्यात संतापाची लाट पसरली असून विरोधी पक्षांच्या आमदारांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ‘सकल हिंदू समाजा  ’ने मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात ‘हिंदू जन आक्रोश’ मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोर्चाआधीच आरोपी ताब्यात आल्याने प्रकरणात मोठा यश मिळाल्याचे मानले जात आहे.

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे अकोल्यात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला – अर्चित चांडक यांनी घटनेची पुष्टी केली आहे आणि असे प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/15-supptriya-passun-upi-vibranat-honar-motha-change/