भारतीय कॅप्टन उन्मुक्त चंदच्या संघर्षाची कहाणी

‘अनब्रोकन: द उन्मुक्त चंद स्टोरी’ आज सिनेमागृहात रिलीज

भारताचे माजी क्रिकेटर उन्मुक्त चंद यांच्यावर आधारित डॉक्यूमेंट्री फिल्म ‘अनब्रोकन: द उन्मुक्त चंद स्टोरी’ आज, 12 सप्टेंबर 2025 रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव खन्ना यांनी केले असून पीवीआरच्या सहकार्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उन्मुक्त चंदने 2012 साली भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून क्रिकेटमध्ये चमकदार सुरुवात केली होती. अनेकांनी त्याला भारताचा पुढचा सुपरस्टार मानले, मात्र नियतीने वेगळा मार्ग दाखवला. भारतीय टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी भारतीय क्रिकेटशी निरोप घेतला आणि संधीच्या शोधात अमेरिकेत पाऊल टाकले.

‘अनब्रोकन’ चित्रपटात उन्मुक्त चंदच्या आयुष्याचे चढ-उतार, अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची संघर्षगाथा, आणि त्याचा क्रिकेट प्रेम दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ क्रिकेट प्रेमींसाठी नाही तर प्रत्येकासाठी प्रेरणास्थ्रोत आहे, जे आयुष्यात अपयशानंतर पुन्हा यशस्वी होण्याची प्रेरणा शोधत आहेत.

उन्मुक्त चंदचा क्रिकेट रेकॉर्ड:
फर्स्ट क्लास मॅचेस – 67
लिस्ट ए मॅचेस – 120
 टी20 सामने – 99
 9000 पेक्षा अधिक धावा
 आयपीएलमध्येही खेळलेले अनुभव
 अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय डेब्यु अजूनही बाकी

ही प्रेरणादायक कथा त्याच्या संघर्षाचा उजेड दाखवणारी असून, स्वप्नांच्या मागे धडपड करणाऱ्यांसाठी आणि सकारात्मक उर्जा शोधणाऱ्यांसाठी विशेष ठरेल.

read also :https://ajinkyabharat.com/aajche-fresh-gestures-aani-shudtechi-sopi-okh/